तो

Mukti

तो तिचे सगळे मूड स्विंग्ज हॅण्डल करतो…

तो तिच्याशी प्रामाणिक असतो…

तो तिच्यावर मनापासून प्रेम करतो..पण व्यक्त करायला कमी पडतो…

तो तिला ‘माणूस ‘ मानतो…

तो तिच्यासोबत आयुष्य घालवायला मिळावं म्हणून सगळ्यांशी भांडतो…

तो तिच्याशी सुध्दा वेळ प्रसंगी भांडतो.. वाद घालतो..अबोला धरतो..पण तिच्यावर हात उगारत नाही….

तो तिच्या कामाचा , शिक्षणाचा आदर करतो…

तो तिच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या सगळ्या कटकटी, किंवा प्रेशर.. सारं काही समजून घेतो …

संबंधित कथा

तो तिच्या मासिक पाळीच्या दिवसात पण तिची खूप काळजी घेतो ..

तो.. तिच्या वाढदिवसाला.. तिला नेमकं हवं असलेलं गिफ्ट देतो..

तो ..ती कामावरून उशिरा आली म्हणून तिच्यावर संशय घेत नाही…

तो.. ऑफिस मधून घरी येताना  तिच्यासाठी सहज म्हणून मोगऱ्याचा गजरा पण आणतो ….

तो..तिच्या प्रेगनन्सी च्या काळात तिचे सगळे डोहाळे पुरवतो… घरातल्या कामाची जबाबदारी घेतो.. जमेल तसा  हातभार लावतो..

तो.. बाळाच्या जन्माच्या वेळेस..कितीही टेन्शन आलं तरी चेहऱ्यावर येऊ न देता शांतपणे तिला धीर देत असतो…

तो .त्या काळात होणारे देखील मूड स्विंग, तिची चिडचिड सगळं सगळं समजून घेतो…

तो कधी कधी बेजबाबदार वाटतो .पण वेळ आली की तो त्याची जबाबदारी.. कर्तव्य चोखपणे पार पाडतो..

तो तिच्या सगळ्या मानसिक आणि शारीरिक गरजा ओळखतो..जाणतो..आणि त्या पूर्ण करायचा प्रयत्न करतो..

तो.. “घरातला कर्ता पुरुष ” म्हणून त्याच्यावर असलेलं प्रेशर मात्र क्वचित तिला जाणवू देतो…

तो.. ती अर्ध्यावर साथ सोडून गेली..तरी त्या दोघांनी थाटलेला संसार…, मुलांची शिक्षणं, आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अर्धवट राहिलेल्या बाकी सगळ्या गोष्टी नीट पार पाडतो…पूर्ण करतो…

या पोस्ट मधल्या “त्याला” #happymensday…. शुभेच्छा ☺️

***

तो आणि ती..#शिवआणिशक्ती… दोघेही श्रेष्ठ.. .या दोघांमुळे ही सृष्टी आहे..मग एकाला कमी आणि एकाला जास्त महत्व का द्यायचे…

—————-

मी लिहिलेल्या पोस्ट मधला “तो” सगळ्या जणीच्या आयुष्यात असतो..फक्त आपण थोडं लक्ष दिलं तर त्याचे प्रयत्न नक्की दिसतील.

(पण एखादी अपवाद असेल सुध्दा जी खरंच

काहीतरी सोसत असेल…🥺..)

दर वेळेस.. बाई च किती सोसते.. स्त्रियांना समाजात किती त्रास वगैरे असतो सगळं मान्य.. पण “पुरुष”.. तो सुध्दा सोसतच असतो.. पुरूषांच्या वीक पॉइंट चा फायदा घेणाऱ्या पण बायका असतात.. त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन त्यांना मानसिक पातळीवर आणि प्रसंगी शारीरिक पातळीवर त्रास देऊन  त्यांचे मानसिक स्वास्थ्य सुध्दा काही बायका बिघडवतात…

आणि MEN DON’T CRY… असं सारखं कानी कपाळी लहानणापासूनच ओरडून सांगितल्या मुळे तर तो पटकन  व्यक्त सुध्दा  होत नाही.. नाहीतर..लोक्स..”काय बायकांसारखा रडतोस”.. असं म्हणून मोकळे होतात…पण त्याला..पण जरा समजून घ्या…

(टीप-स्त्री पुरुष समानता किंवा आम्ही किती गरीब बापडे.. हे सिध्द करायला कमेंट करू नका 😄.. तो विषय घेऊन नंतर कधीतरी भांडूया…)

असो… 🤭😄

संबंधित कथा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे सुध्दा वाचा
Close
Back to top button
error: Content is protected !!