एक कंटाळवाणा दिवस
रोजच्या सारखी सकाळ, नंतर तिथून पुढे सकाळची रोजची कामं, मग लॉगिन, रिपोर्ट्स, कॉल्स,मिटिंग्स..आऊटलुक चा मेल इनबॉक्स गच्च भरलेला…
आणि कहर म्हणजे…हे इतकं सगळं असून …काय करू म्हणजे मला आज सुट्टी टाकता येईल ..या विचारत मी..
सिक लिव्ह टाकू का…, जळलं पण त्यासाठी काहीतरी आजार शोधावा लागेल, काय बरं सांगू..अं..अं.. सर्दी खोकला नकोच, लगेच बॉस ची टकळी..काही होत नाही, सर्दी खोकला झाला म्हणून सुट्टी कशाला हवीये…. टेस्ट कर, वाफ घे, गरम पाणी पी…आणि थोड्या वेळाने केलंस का ग, … त्यासाठी पुन्हा त्याचे फोन…
पोट दुखतंय सांगू का..नकोच, मग लगेच, लडकी लोगो को यही तकलीफ होती है हमेशा..वही नाटक… असल्या चर्चा सुरू होतील…
मग काय बरं सांगू..उलट्या ,जुलाब होतायत सांगितलं तर अजून वैताग..मग माझी टीम…अं.. अं… मानसी मॅडम, काssssय गुड न्युज वाटतं……छे.. हे तर अजिबातच नको…
या कोरोना मुळे सुट्टी टाकायची पण चोरी झालीये…आधी पावसामुळे ट्रेन लेट, पाणी भरलंय, येऊ शकत नाही , असलं काही चालून जायचं,(मी त्यात अडकलेली असो अथवा नसो), कारण फक्त पावसात भिजून धमाल करायची खुमखुमी (इथे वेगळा शब्द अपेक्षित आहे, पण नकोच )…
पण तितक्यात बॉसनेच मेल टाकला, आज माझ्याकडे लाईट नाहीयेत, इन्व्हर्टर पण बंद होईल, so मी आज सुट्टी घेतोय…
(म्हणजे मला हवी असणारी सुट्टी बॉसनेच घेतली, मेरा प्लॅन चौपट हो गया😓
इतका छान पाऊस,कोझी डोझी वातावरण , मुसळधार पाऊस पडण्या आधी झालेला अंधार, मस्त पावसात हुंदडायला जायचा मूड, गरम चहा, जमलंच तर कांदा भजी…पण छे… ते सगळे मनातच राहिले…..
दुष्काळात तेरावा महिना की काय म्हणतात ते हेच असावे 😓…..
आता करा अजून वाढलेली कामं.. आणि विसरा सुट्टी….
टीप-..विनाकारण सिरीयस होऊन कंमेंट मध्ये उपदेश नको 😄🙏, गम्मत म्हणून वाचा…