#late_mark
#सत्यघटना
दर आठवड्याला शनिवार रविवार..आराम झाला की.. हमखास सोमवारी उशिरा जाग येते… आणि उशिरा जाग आली..की सुरू होतो.. घड्याळाच्या काट्यांचा जीवघेणा खेळ.. ते अशा वेळेस आणखी पटापटा धावायला लागतात…
आजही तेच झालं…मग, रोजची ट्रेन चुकू नये म्हणून भराभर आवरलं… कारण ट्रेन चुकली.. तर मग पुढे आणखी अनेक गोंधळ होतात…
पण धावत पळत का होईना.. रोजची ट्रेन मिळाली…
उरलेली झोप पूर्ण करायची म्हणून कल्याण ला बसल्यावर जे डोळे मिटले ते थेट ” अग्ला स्टेशन घाटकोपर” असं त्या बाईने तीन वेगळ्या भाषेत सांगून सुध्दा उघडत नव्हते.. पण अखेरीस.. आता पुढचं स्टेशन विद्याविहार म्हणली..तेव्हा आत्यंतिक कष्टाने उतरावं लागलं..
मनात आलं.. ” चला..उठायला उशीर झाला.. घरातलं थोडं फार काम बाकी राहिलं.तरी ठीक..पण रोजची ट्रेन मिळाली ना..बास्स.. त्यामुळे हापिसात जायला मात्र उशीर होत नाहिये…
मी समाधानाने शेअर रिक्षा स्टँड वर गेले.तिथे एक रिक्षावाला चौथ्या सीट च्या प्रतीक्षेत उभा होता.. पण मी गेल्यामुळे….मागे बसलेल्या पुरुष्माणसाला पुढे येऊन बसावं लागलं..
आता रिक्षा सुसाट… त्याचा चालवण्याचा स्पीड बघून मी सॉलिड खूष झाले.. वाह… असं सर्कन गेलो… तर आता 5 min आधीच पोचणार..late mark वगैरे भानगड नाही…
तितक्यातच पुढे बसलेला पुरुष्माणूस त्याला म्हणाला.. “साईड मे रुकाव” ….
रिक्षा थांबली..माझा जीव खालीवर..किती वेळ अजून..
हा आपला हळू हळू..या खिश्यात हात घाल, pant च्या खिशात हात घाल करत, रमत गमत,….. सुट्टे पैसे शोधत होता..
(जेव्हा आपल्याला उशीर झालेला असतो ना तेव्हा अख्खं जग सिलो वाटायला लागतं)…
माझे सहनशक्ती संपत आली..रिक्षा थांबलीय.. घड्याळ धावतंय…
मी त्या रिक्षावाल्याला म्हणणार, अय… यांचे 10 रुपये देते मी..तू चल..उशीर झालाय मला..
तेव्हढ्यात या महापुरूष्माणसाला..10 रुपयाची नोट सापडली आणि रिक्षा निघाली….शेवटी काय.. मुख्य ट्रेन वेळेत मिळून..इतकं सगळं वेळेत होऊन मला उशीर झालाच..
(ते नाही का…जेव्हा बायका म्हणतात आलेच पटकन तयार होऊन..तेव्हा लागणारा वेळ..आणि यांना हे सुट्टे पैसे शोधण्यासाठी लागणारा वेळ यात मला खूप साम्य जाणवलं.).
मुळात आम्ही कसे आधीच पैसे हाताशी ठेऊन बसतो..तसे यांना करायला काय होते..??
लागला ना आज late mark.. 😥
©️ मानसी