जांगडगुत्ता
सोमवारची अतिशय भयंकर, कंटाळवाणी सकाळची वेळ…, सतत आ करून येणाऱ्या जांभया…. यात आणखी भर म्हणून गच्च थंडी…
वाट्टेल त्या गोष्टीचा..अगदी..कशाचाही राग येईल आणि वादाला सुरूवात होईल असा मूड…
होय.. सोमवार सकाळ ही आम्हा चाकरमानी लोकांसाठी कधीच छान असू शकत नाही.. (हां..जर salary date सोमवारी आली असेल तर मात्र गोष्ट वेगळी.🤩…)
तर ही अशी सोमवार सकाळ..
Indicator वर मला cst train दिसते…
M indicator मधे dadar ट्रेन दिसते…
मी मनाशी विचार करते.. मरेना का..आपल्याला तर विद्याविहार ला जायचं..दोन्ही चालतील..
मी ट्रेन मध्ये चढते.. ट्रेन च्याआत असलेल्या इंडिकेटर वर लास्ट स्टेशन दादर दिसतं… अगला स्टेशन ठाकुर्ली च्या ऐवजी डायरेक्ट ‘दिवा जंक्शन ‘ दिसतं..
आणि यावर कळस म्हंजे ती ट्रेन मधली बाई म्हणते.. अग्ला स्टेशन डोंबिवली 🙄…
अर्रे.. #केहनाक्याचाहते_हो
जांगडगुत्ता या शब्दाची प्रचिती येणं..ते हेच…
पण मग हे विधात्या..
या अशा केविलवाण्या अवस्थेत आम्ही पामरांनी शांतपणे झोपायचे तरी कसे…. 🥴🥴🥴…
#mumbai_local #local_diaries
#एकलोकलप्रवासी