गजरा

“एक गजरा दे ग” नेहमीच्या गजरे वाली कडे तो थांबला, पैसे दिले, आणि हळू हळू चालत घरी यायला निघाला. डोक्यात विचार सुरू होते…40 वर्षांचा संसार आमचा, पण हिला कसला मोह नाही, कसल्या मागण्या नाहीत, कसले हट्ट नाहीत.माझा हा असा विक्षिप्त स्वभाव सांभाळून, इतकी वर्षे नोकरी करून, मुलांचं सगळं करून दमली बिचारी,……पण आता तिचे लाड करायचे म्हणून गेल्या 2-3 वर्षांपासून रोज गजरा नेऊन तिच्या केसात माळणे हा नियम लावून घेतला आपण,….आणि दर वेळेस तिचं ते गजरा माळत असताना लाजणं , आनंदी होणं,अगदी नवीन,…..त्यात रोज घडणारी घटना म्हणून अजिबात रुक्षता नाही,की काही नाही, हेच ते क्षण ………………, जे आम्ही अजून ही जगतोय..
स्वतः शी हसत दारात येऊन पोचला सुद्धा,………………..
बेल वाजवली, हिने हळू हळू पावलं टाकत दार उघडलं. त्याला हसत म्हणाली, आज 2 गजरे आणलेत वाटतं, घमघमाट जास्त आहे, असं म्हणत चहा आणायला आत गेली.त्याने गजरा टेबलावर ठेवला, चहा झाला की रोजच्या सारखा माळूया तिच्या केसात, असा विचार करून थकून कोचावर येऊन बसला……
काल रात्रीपासून छातीत दुखतंय हिच्या, डॉक्टरांना फोन करतो आत्ताच, असा विचार करत त्याने फोन काढला तेवढ्यात ती चहा घेऊन आली.त्याने विचारलं,” कमी आहे का ग दुखायचं, चल ना डॉक्टरांकडे कडे जाऊया “.ती म्हणाली, “आधी हा चहा, अरे घाबरू नकोस, नॉर्मल दुखतंय, मी काय इतकी म्हतारी झाले का, फक्त 62 वय आहे माझं”, आणि क्षीण हसली…म्हणाली..
“तुला आठवतंय, मला म्हणला होतास, आपल्यात आधी कोण जायला हवं असेल तर तू जावीस, तुला आधी मरण यावं..”यावर मी हसून म्हटलं होतं, अर्थात, मला पहिला नंबर नेहमीच आवडतो, मीच आधी जाणार…खरं तर तू तेव्हाच मान्य केलंस, की माझं तुझ्या वर जास्त प्रेम आहे ,तेवढं तुझं माझ्यावर प्रेम नाही”,.. आणि मग तिने उगाच त्याला दुःखी नाटकी चेहरा करून दाखवला..आणि दोघेही मनमोकळं हसले..
“इतके म्हातारे झालो आपण, पण अजून ही वाटतंय की तेच आहे सगळं, काहीच बदललं नाही ग, फक्त आपली मुलं परदेशी गेली, आणि उरलोय आपण दोघे, एकमेकांना, बाकी कोणी नाही,आता पुढचा प्रवास जो काही उरलाय तो, एकमेकांच्या सोबतीने करू, आणि आता बस्स झालं तुझं सारखं काळजी करणं, विचार करणं, आता तू पण जरा स्वतः साठी जगायला शीक, “…….त्याने दम च दिला.आणि त्याचं लक्ष टेबलावर गेलं..
ती म्हणाली, अरे हो हो, किती रागावशील मला ,आता तरी नको, बरं वाटत नाहीये ना मला, मग जरा प्रेमाने सांग की, बरं सगळं ऐकेन हं मी तुझं, पण हे काल पासून थोडं छातीत दुखतंय आणि चक्कर पण येतेय, ते बरं झालं की मग जाऊ आपण जरा बाहेर, काही वस्तू घ्यायच्या आहेत, आणि डॉक्टरांना फोन कर,औषध पण आण, कारण मला तुझ्या सोबत मस्त जगायचं आहे, मज्जा करायची आहे, पण हे दुखत असेल तर कसं करणार?? कर तू फोन..
एवढं बोलून रिकामे चहाचे कप घेऊन kitchen कडे जायला निघाली. त्याने समाधानी मनाने Doctor ना फोन केला, Ring वाजली, आणि तेवढ्यात किचन मधून cup फुटल्याचा आवाज आला, त्याने Phone कट केला आणि त्याच्या छातीत धस्स झालं,…………………………………………………
तो थरथरत्या पायांनी किचन कडे गेला, ती पडली होती,कप फुटून विखुरलेले होते, हिच्या डोक्याला खोक पडली होती, रक्त येत होतं, तिला पाहून त्याच्या छातीत कळ आली आणि तो  suddha तिथेच कोसळला..
.. टेबलावरचा मोगरा मात्र तसाच..तिथेच कोमेजून गेला……
(टीप:गोष्ट काल्पनिक आहे)
✍️©️मानसी

संबंधित कथा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!