नातिचरामि
एक अनुभव …
मी ठाण्याला article ship करत होते.. कल्याण,ठाणे अंतर कमी, त्यात फास्ट ट्रेन , आत जाऊन बसण्याचा विषयच नाही…फास्ट ट्रेन मध्ये पिक hours la खूप गर्दी, माझ्या पुढे असलेली बाई व्हॉट्सॲप वर बोलत होती.आम्ही इतकं रेटून उभे होतो..की त्या बाईच्या खांद्यावर माझी हनुवटी almost टेकली होती..ती hubby la सांगत होती, हो मला ट्रेन मिळाली, उभीच आहे मी.. नंतर दुसऱ्या नंबर वर गेली, त्या व्यक्तीला म्हणाली,..कधी एकदा तुला घट्ट भेटते असं झालंय.. घरी माहित नाहिये उद्या सुट्टी टाकली आहे.. बाहेर नको थांबायला जास्त वेळ ,लगेच कल्टी मारूया..उगाच कोणी बघितलं तर risk नको…”
माझ्यासाठी तो पहिला अनुभव होता..ऐसा भी हो सकता हैं..😄..मला तेव्हा सांस्कृतिक धक्का बसला होता…
हल्ली तर ट्रेन मध्ये तर इतके कमालीचे अनुभव येतात.. गर्दी इतकी असते की इच्छा नसताना सुध्दा बाजूच्या माणसाच्या मोबाईल मधे काय सुरू आहे हे सगळं दिसत असतं..
एकमेकांशी loyal, प्रामाणिक असणं…किंवा one woman man, one man woman असणं…हे दुर्मिळ झालंय हल्ली. आणि कोणी जर इतकं loyal असेल सुध्दा तर त्याच्या आजूबाजूचे त्याला वेड्यात काढतात..😄..
“अरे,काही होत नाही… मजा करून घे..आयुष्य एकदाच मिळतं.. तारुण्य एकदाच मिळतं…”
” कोणाला काही कळणार नाही. जाताना सगळं delete करून जायचं फक्त..”
“मी आहे ना..इतके दिवस मी केलं,कोणाला काही समजलं का… शेवटी माणूस आहोत आपण..”
असे शाब्दिक आधार देणारे खूप असतात..पण जेव्हा खरंच आधार द्यायची वेळ येते ,, मग तो आधार… आर्थिक किंवा शारीरिक, अगदी मी तर म्हणते.. मानसिक सुध्दा.. ,तेव्हा हेच शेपूट घालून विविध मार्ग शोधून धूम ठोकतात….
.
मोहाचे क्षण इतके असतात.. की सहज तोल जातो.. मग तोल सावरेपर्यंत उशीर झालेला असतो.. सोशल मिडिया मुळे सगळं सहज साध्य झालं आहे… त्यात advance technology, advancedmobiles, सगळं काही लपून छपून करायची इतकी सोय आहे की विचारू नका.. या कानाचं..त्या कानाला कळणार नाही इतकं सफाईदारपणे सगळं होतं…
अर्थात आपण बाकीच्यांना , आपल्या आजूबाजूला असणाऱ्या, आपल्या आयुष्यात असणाऱ्या लोकांना सहज फसवू शकतो..पण स्वतः ला फसवू शकतो का??
आणि जी माणसं ते सुध्दा करू शकतात, स्वतः ला फसवून बेमालूमपणे सारं काही करू शकतात ती तर मग कोणत्याही नात्यासाठी लायक नसतात….अशा माणसांनी कोणत्याच नात्यात गुंतू नये, आणि कोणाच्याही आयुष्याशी खेळू नये…
अशाने फक्त कोर्टात फाईल्स ची केवळ संख्या वाढत राहते….
©️मानसी