रसिकहो
हल्ली ‘रसिकहो’ म्हटलं.. किंवा आणखी कोणत्या कार्यक्रमात निवेदन करणाऱ्या माणसाने हे’ रसिकहो ‘म्हटलं की फक्त हसायला येतं.. याला फक्त Samir Choughule दादाचा ‘लोचन मजनू’ कारणीभूत आहे 😁🤣🤣… मग ते आलेलं हसू,… मोठ्याने खोकून, किंवा खोटी खोटी शिंक आली आहे, किंवा मग खूप सर्दी झाली आहे, असं काहीतरी करून लपवावं लागतं…😁…
असो, सांगायचं असं की…
इथे Facebook नावाच्या किंवा कोणत्याही सोशल मीडिया वर असलेल्या हक्काच्या प्लॅटफॉर्म वर rather स्टेज वर प्रत्येकजण आपापल्यापरीने काही ना काही पोस्ट टाकत असतो, कोणी गाणं, कोणी लेख, व्हिडिओ, meme, एखादा सुविचार, एखाद्या पदार्थाची रेसिपी, अगदी सगळंच…
पण जेव्हा हे असे पोस्ट करणारे लोक… त्या पोस्टी ला response मिळाला नाही किंवा अपेक्षित लाईक्स, कमेंट्स, बदाम किंवा तत्सम काही झालं नाही की कमालीचे नाराज पण होतात..
यात audience, रसिक प्रेक्षक, रसिक मायबाप यांना काय आवडू शकतं हे कोणालाच नक्की असं सांगता येत नाही..
पण हा जो ‘रसिक वर्ग ‘ इथे सोशल मीडिया वर आहे, ते खरंच ग्रेट आहेत….
कायम दुसऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी सुध्दा तेवढं मोठं मन..in fact तेवढं संवेदनशील मन असायला लागतं.. आणि ते तसे लोक इथे माझ्या लिस्ट मधे आहेच..याचा मला आनंद आहे..🤗..
म्हणजे मी किंवा कोणीही काहीही पोस्ट केलं तरी त्यावर हजेरी लावणारे, कौतुक करणारे, दाद देणारे, ते आणखी अजून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करणारे जे आहेत.. त्यांचं जास्त कौतुक आहे…
हा रसिक वर्ग आहे म्हणूनच आमच्या सारख्या अधून मधून संमिश्र पोष्टी करणाऱ्या लोकांना भारी वगैरे वाटतं…
तुम्ही आहात म्हणून कलाकार आहेत… आवडलं तर डोक्यावर घेऊन नाचाल.. आणि नाही आवडलं तर खाली आपटाल.. इतकी ताकद या रसिक प्रेक्षक वर्गात नक्कीच आहे…