आईपण
“कंटाळा आलाय आता.. सारखं तेच तेच, रात्री जागरण, त्यात हे कंबरेचं दुखणं, कुठे जायला मिळत नाही, नोकरी करता येत नाही.. इतक्या लहान बाळाला पाळणाघरात सुध्दा ठेवता येणार नाही… घरातला पसारा आवरला जात नाही. कितीही करा,कामं संपतच नाहीत..…
निरागस वास्तव
तिची गडबड सुरू होती,डबा झाला, पिल्लू ची शाळेची तयारी झाली, त्याचं दप्तर, डबा, खाऊचा डबा, पाण्याची बाटली, सगळं सगळं तयार होतं…, वेळ बघितली, आणि तिची घाई वाढली,घड्याळ तिच्या नजरेत अगदी मॅरेथॉन मध्ये धावत होतं, ऑफिस ची वेळ…
#late_mark
#सत्यघटना दर आठवड्याला शनिवार रविवार..आराम झाला की.. हमखास सोमवारी उशिरा जाग येते… आणि उशिरा जाग आली..की सुरू होतो.. घड्याळाच्या काट्यांचा जीवघेणा खेळ.. ते अशा वेळेस आणखी पटापटा धावायला लागतात… आजही तेच झालं…मग, रोजची ट्रेन चुकू नये म्हणून…
बाहेरख्याली
“इतकी कशी ग तू निर्ढावलीस, हे सगळं करायच्या आधी आमच्या इज्जतीचा विचार तरी करायचा, स्वतः चं नाव खराब होईल, याची तर तुला पर्वाच नाही, पण किमान माझा तरी विचार करायचा.. की जर याला समजलं तर काय होईल…
लेडीज डबा
महिला डब्याच्या जागी.. सगळ्याजणी उभ्या असतात… काही रोजच्याच तर…काही नवीन… ट्रेन प्लॅटफॉर्म ला टेकते… भराभर सगळ्या डब्यात शिरतात.. रोजची ट्रेन असल्याने बऱ्याच जणी एकमेकींना ओळखणाऱ्या असतात… स्टेशनात भकास आलेला तो डबा आता विविध रंगांनी सजून जातो. बरं..…